श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा विश्वविक्रम; वर्षभरात सर्वाधिक भाविकांची भेट

    02-Dec-2025
Total Views |
 

daa 
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर ठरले आहे. नुकतेच विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्सतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्सच्या चेअरमन डाॅ. ईशा अगरवाल व 184 विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय डाॅ. दीपक हरके यांच्या हस्ते ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जगभरातील गणेशभ्नतांचे लाडके दैवत आहे; तसेच दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गाैरवाभिमानाचा सर्वाेच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी देशभरातले आणि विदेशांतून असंख्य भ्नत या गणेशाच्या दर्शनाला येतात. यंदा संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर म्हणून हे विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.