साताऱ्यातील जावळी तालुक्यातील बामणाेलीजवळ दुर्गम भागातील सावरी या गावात मेफेड्राेन हा अमली पदार्थ तयार करणारा कारखाना पाेलीस कारवाईत उघडकीस आला. मुंबई आणि सातारा पाेलिसांनी संयु्नतरित्या या कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात काेट्यवधी रुपयांचे मेफेड्राेन (एमडी) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि यंत्रसामग्री जप्त केली. गाेपनीयतेने करण्यात आलेल्या या कारवाईत तीन जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.काेयनेच्या खाेऱ्यातील बामणाेलीलगत असलेले सावरी हे गाव दुर्गम जागी वसलेले आहे. या गावात मेफेड्राेन तयारकरणारा कारखाना छुप्या पद्धतीने सुरू असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती.
या माहितीची खात्री केल्यावर मुंबई आणि सातारा पाेलिसांनी संयु्नतरित्या या कारखान्यावर छापा टाकला. यात मुंबई गुन्हे अन्वेषण विभागासह सातारा उपविभागीय पाेलीस अधिकारी राजीव नवले यांच्या नेतृत्वाखाली माेठे पथक सहभागी झाले हाेते.या गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्राेन तयार करणारा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले. तेथे काम करत असलेल्या तीन कामगारांना चाैकशीसाठी पाेलिसानी ताब्यात घेतले; तसेच मेफेड्राेन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि यंत्रसामग्री जप्त केली. याची बाजारातील किंमत काेट्यवधी रुपये आहे.