जीवनातील प्रत्येक काम समरसतेने करा

    17-Dec-2025
Total Views |
 
 
 
life
आपल्या मेंदूत एकाच वेळी खूप साऱ्या गाेष्टी चालत असतात.त्यामुळे आपण महत्त्वाच्या गाेष्टीही जवळ जाऊन लक्षपूर्वक पाहू शकत नाही. झेपा घेत जाताे कारण खूप घाईत असताे. पण जीवनातील वाटा खूप विचित्र आहेत. येथे कुठे उडी मारावी लागते तर कधी पाेहायचे असते, कधी उडायचे असते, कधी घुसमटायचे असते. तर कधी अजिबात थांबायचे असते. काेणत्याही एकाच चालीने जीवन चालवू शकत नसताे.यासाठी ज्या काेणत्या पावलावर असाल तेवढा वेळ धैर्याने ती स्थिती पाहा. थाेडे जवळ जा., स्थिती वा व्यक्ती जी असेल ती व्यवस्थित ओळखा. धावपळीत आण चुकीची व्यक्ती स्वीकाराल व चांगली व्यक्ती गमावून बसाल. यासाठी पावलाेपावली जीवन जगा.
 
जादा उडू-बागडू नका. आता तर असे वाटत आहे की जणू जीवनाचा संबंधच संपला आहे फक्त जगत आहाेत. प्राणीही जगतात पण माणूस जगत जीवन पकडू शकताे. जर फक्त जगत असाल तर मरणाची वाट पाहात आहाेत असे समजा. यामुळेच अनेकांच्या जीवनात औदासीन्य, थकवा आणि अस्वस्थता येते. जीवन ओझे वाटू लागते. यासाठी जे काम कराल ते तन्मयतेने करा, त्यात बुडून जा, रमून जा. त्यात खाेलवर उतरा. भले ते एक क्षणासाठी का असेना. याचे वेळेशी काही देणेघेणे नाही. पूर्ण चेतनेने आपल्याला कळेल की जीवनात किती महत्त्वाच्या गाेष्टी विखरून पडल्या आहेत. पण घाईगडबडीत आपण त्या साेडून जात राहिलाे आहाेत.
यासाठी प्रत्येक पाऊल जीवनासाेबत उचला.