शहरामध्ये राहणारे बहुतांश लाेक रात्री फार उशिरा जेवण करतात.एवढंच नाही, ते प्रखर प्रकाशातील वातावरणात जेवण कसेबसे गळ्याखाली उतरवून जेवणाचे काम पूर्ण करतात. परंतु, अलीकडे झालेल्या एका अभ्यासानुसार, कमी प्रकाशात, धीम्या गतीने, चावून-चावून खाल्ल्याने वजन घटते. जेव्हा तुम्ही हलक्या प्रकाशात जेवण करायला बसता, तेव्हा तुम्हाला भूक कमी लागते.स्वाभाविकपणेच तुम्ही कमी खाता, जे तुमचे वजन घटवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.जर्नल ऑफ कन्झ्युमर रिसर्चच्या एका अभ्यासानुसार डीम लाइटमध्ये हलके संगीत चालू असेल तेव्हा तुमची जेवण ग्रहण करण्याची गतीदेखील धिमी पडते. आणि जेव्हा तुम्ही हळूहळू, चावून-चावून खात असता तेव्हा पाेटाला संताेष झाल्याचा संकेत मेंदूपर्यंत वेळीच पाेहचताे.अशा प्रकारे जास्त खाण्याची संभावना कमी हाेते. दुसरीकडे तर तुम्ही काेलाहलामध्ये, प्रखर प्रकाशात जेवण घेता तेव्हा मेंदूला पाेट भरले असल्याचा संकेत उशिरा मिळताे.स्वाभाविकपणेच तुमच्याकडून थाेडे जास्त खाल्ले जाते.
निष्णांत म्हणतात की हलक्या प्रकाशात आणि शांत वातावरणात भाेजन घेतल्याने वजन कमी करण्यामध्ये मदत मिळते, ही गाेष्ट खरी आहे, परंतु ते वातावरण आपल्या तनामनाला कशा प्रकारे प्रभावित करते हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. हलक्या प्रकाशात मन-मेंदू शांत राहिल्याने मानसिक ताण आणि चिंता कमी हाेऊन जाते, परिणामी कार्टिसाेलचे (तणाव निर्माण करणारे हाॅर्माेन्स) स्तर घटते. वास्तवात कार्टिसाेलचा स्राव जास्त हाेताे तेव्हा भूक जास्त लागते.हलक्या वातावरणामध्ये जेवण केल्याने इमाेशनल इटिंगवर नियंत्रण राहते.स्वाभाविकपणेच तुम्ही तुलनेत कमी जेवण घेता जे शेवटी वजन कमी करते.दुसऱ्या एका अभ्यासानुसार, शांत आणि आरामदायक वातावरणात जेवल्याने पचनसंस्थाही चांगल्या प्रकारे काम करते. याने सकारात्मक परिणाम चयापचयाच्या क्रियेवर दिसून येते.जेव्हा मेटाबाॅलिझम व्यवस्थित असते तेव्हा शरीर जास्त कॅलरीज जाळते, जे वजन कमी करण्यात मदत करते.