महाराष्ट्र सदनातील खाद्य महाेत्सवाला दिल्लीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

    17-Dec-2025
Total Views |
 

food 
 
 
देशाच्या राजधानीत गेले तीन दिवस आयाेजित महाराष्ट्र खाद्य महाेत्सव2025च्या निमित्ताने महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा खमंग दरवळ दिल्लीकरांना माेहित करून गेला. केवळ खाद्यपदार्थांच्या सादरीकरणापुरता हा महाेत्सव मर्यादित न राहता संस्कृतीच्या विविध आविष्कारांचे दर्शन यातून घडले आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला राष्ट्रीय स्तरावरही व्यासपीठ मिळाले.
दिल्लीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या महाेत्सवाचा नुकताच समाराेप झाला.नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आयाेजिण्यात केलेल्या या महाेत्सवाचे उद्घाटन शेफ विष्णू मनाेहर यांच्या हस्ते करण्यात आले हाेते. तीन दिवस सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत दिल्लीच्या थंड हवेत महाराष्ट्राच्या मातीचा दरवळणारा खमंग सुगंध आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साह लक्षणीय हाेता.
 
मालवणी सीफूड, काेल्हापूरचा तिखट तांबडा-पांढरा रस्साविदर्भातील झणझणीत सावजी मटण रस्सा, काेल्हापूरची मिसळ, खिमा पाव, खानदेशातील खापरावरची पुरणपाेळी, वांग्याचे भरीत, गाेळा भात, सांभार वडी, उकडीचे माेदक आणि शेवभाजी यासारखे पदार्थ चाखण्यासाठी खवय्यांची माेठी गर्दी झाली हाेतीया उत्सवाचे खरे वैभव ठरले ते राज्यातील आठ जिल्ह्यांतील ‘उमेद’अंतर्गत कार्यरत महिला स्वयंसहायता गटांचा सहभाग. अमरावती, जळगाव, सातारा, काेल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, बीड आणि नागपूर येथील प्रशिक्षित महिलांनी आपले घरगुती आणि पारंपरिक पदार्थ राष्ट्रीय स्तरावर सादर करून ओळख मिळवली.निवासी आयु्नत आर. विमला यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी त्यांचे आभार मानले. आर. विमला यांच्या हस्ते सर्व सहभागी महिला बचत गटांच्या सदस्यांचा खास सन्मान करण्यात आला.केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी या महाेत्सवास हजेरी लावली.