नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या धावपट्टीच्या उभारणीसाठी सिडकाेने हालचाली सुरू केल्या आहेत.सिडकाेने तिसऱ्या धावपट्टीसाठी टेक्नाेव्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास (टेक्नाे कमर्शियल फिजिबिलिटी स्टडी) करण्यासाठी सल्लागार नियु्नतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात नुकतीच ई-निविदा सूचना सिडकाेने प्रसिद्ध केली आहे.नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात सध्या प्रत्येकी 3700 मीटर लांबीच्या दाेन धावपट्ट्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. यापैकी पहिल्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या धावपट्टीचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन आहे. मात्र, वाढती प्रवासी क्षमता, कार्गाे वाहतूक आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणांची गरज लक्षात घेता तिसऱ्या धावपट्टीची आवश्यकता हाेती.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तिसऱ्या धावपट्टीच्या विकासासाठी विद्यमान विमानतळाची जागा आणि विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील काही टेकड्या व जमिनीची स्थिती पाहून त्यावर धावपट्टीची उभारणी करू शकताे का, याची टेक्नाे कमर्शियल व्यवहार्यता अभ्यास सल्लागाराकडून केला जाणार आहे.या कामासाठी सल्लागार नियु्नत करण्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव (आरएफपी) मागवले आहेत.सल्लागाराची नियु्नती किमान खर्च निवड पद्धतीने केली जाणार आहे.या सल्लागाराला सहा महिन्यांच्या कालावधीत अभ्यास अहवाल सादर करावा लागणार आहे.