मतदानाबाबतची अनास्था दूर करण्यासाठी आणि मतट्नका वाढवण्यासाठी महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच राहत्या इमारतीच्या आवारातच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयाेगाने घेतल्याची माहिती निवडणूक आयाेगाकडून देण्यात आली. मतदार याद्यांप्रमाणेच प्रत्येक निवडणुकीतील मुंबईकरांचा निरुत्साह आयाेगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. विशेषत: दक्षिण मुंबईतील मतदार मतदानासाठी बाहेर पडत नसल्याचे वेळाेवेळी दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत मतट्नका वाढवण्यासाठी आयाेगाने प्रथमच माेठ्या गृहनिर्माण संकुलांच्या आवारात मतदान केंद्रे उभारली हाेती. त्यामुळेविधानसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील मतट्नका वाढला हाेता. महापालिका निवडणुकीतही मतांची ट्नकेवारी वाढवण्यासाठी हा प्रयाेग करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयु्नत दिनेश वाघमारे यांनी दिली.
मुंबईतील मतदारांना मतदानासाठी विविध साेयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावेळी गृहनिर्माण संस्थांच्या आवारातच मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदानांना माेठी सुविधा हाेणार आहे. मुंबईत यावेळी 880 मतदान केंद्रे माेठ्या गृहनिर्माण संकुलात किंवा इमारतींच्या आवारात असतील. साधारणत: 1000-1200 मतदार असलेल्या गृहनिर्माण संकुलात ही केंद्रे असतील. मात्र, एखादा उमेदवार त्याच इमारतीत राहणारा असेल तर तेथे मतदान केंद्र नसेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.