नाताळनिमित्त वसई-विरारमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ख्रिसमस ट्री, नाताळ तारा; तसेच इतर रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्यामुळे शहरातील बाजारपेठा सजू लागल्या आहेत. दुसरीकडे सजावट साहित्य खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची लगबग सुरू झाली आहे. वसई-विरारच्या पश्चिम पट्ट्यात माेठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहतात.त्यामुळे वसईतही माेठ्या जल्लाेषात नाताळ साजरा केला जाताे. नाताळला अवघे दाेन आठवडे शिल्लक असताना मुख्य बाजारपेठा, शहरातील विविध चर्च तसेच शाळा- महाविद्यालयांचे आवार अशा विविध ठिकाणी उभारण्यात आलेली लहान-माेठी दुकाने नाताळ
सजावटीच्या साहित्याने सजली आहेत.यंदा बाजारात ख्रिसमस ट्री, ख्रिसमस टाॅवर, नाताळ गाेठे व ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, सांताक्लाॅज, ख्रिसमस टाेपी, स्नाे मॅन, नाताळ तारा, रेन डीअर, मुलांसाठी खेळणी, सांताक्लाॅजचा पेहराव, विद्युत राेषणाईसाठीचे साहित्य, सुशाेभित वेली, भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक भेटकागद, पिशव्या, भेटकार्ड अशा विविध प्रकारच्या साहित्याने बाजारपेठा बहरल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सजावट साहित्याच्या किमतीत 10 ते 15 ट्नके वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.