किशाेर वयीन साेशल मीडिया वापरतात, तेव्हा बहुतांशवेळी त्यांच्या स्क्रीन टाइमवर स्कूल व पालक लक्ष ठेवतात. पण, ज्येष्ठ नागरिकांच्याबाबतीत असे काही हाेत नाही. ते स्वतःच निर्णय घेतात.अनेकवेळेस त्यांना माहीत नसते की, त्यांना मदतीची गरज आहे. गेमिंग ्निलनिक चालविणाऱ्या हेनरिएटा बाेडेन-जाेंस यांनी सांगितले की, अनेकवेळेस ज्येष्ठ नागरिकांजवळ काेणी नसते. आणि जरी असले तरी ते पाहू शकत नाही की, ज्येष्ठ नागरिक संगणकावर काय करत आहेत. चीनमध्येही वाढल्या समस्या रिसर्चमध्ये दिसून आले आहे की, स्क्रीन टाइम वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे. चीनमध्ये 60 वर्षावरील लाेकांवर केलेल्या पाहणीत दिसून आले की, अनेकांच्या झाेपेच्या समस्यांमागे स्क्रीन टाइम हे कारण आहे.
द. काेरियात 15 टक्के ज्येष्ठ स्मार्टफाेनच्या व्यसनात दक्षिण काेरियामध्ये झालेल्या पाहणीनुसार 60-69 वयाेगटांतील 15 टक्के ज्येष्ठ नागरिक स्मार्टफाेनच्या व्यसनाधीन हाेण्याच्या उंबरठ्यावर आहेत. हा आकडा ठरविताना, ज्येष्ठांना विचारण्यात आले की, ते स्मार्टफाेनचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यात त्यांना यश मिळत नाही, अशी परिस्थिती आहे का, त्यावर या नागरिकांनी सकारात्मक उत्तर दिले.जपानमध्ये दिसला ज्येष्ठांच्या झाेपेवर दुष्परिणाम जपानमध्ये केलेल्या पाहणीत दिसून आले की, स्क्रीन टाइम वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या पाहणीत दिसून आली की, स्क्रीनटाइम जास्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना शांत झाेप लागत नाही. त्यांना झाेपेच्या समस्या जास्त जाणवतात.
ब्रिटन, अमेरिकेत युवांपेक्षा ज्येष्ठ पुढे ब्रिटनच्या नॅशनल गेमिंग डिसऑर्डर सेंटरमध्ये 676 ज्येष्ठ नागरिकांचा इलाज झाला आहे. अमेरिकेत 65 वर्षांवरील लाेक आता 25 वर्षापेक्षा कमी वयाच्या युवांच्या तुलनेत अधिक टॅबलेट, स्मार्ट टीव्ही, ई-रीडर व संगणक वापरतात.एकूण स्क्रीन टाइम युवांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त दिसताे.ज्येष्ठांची फसवणूक हाेण्याच्या श्नयताही जास्त स्क्रीन टाइमचा दुष्परिणाम ज्येष्ठ नागरिकांमध्ये किशाेरांपेक्षा वेगळा दिसताे. काही जेष्ठांचे स्मार्टफाेन, टॅबलेट आदी बँक खात्यांशी जाेडलेले असतात. फ्राॅड करणारे लाेक अॅपच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करून, त्यांची फसवणूक करू शकतात.
स्क्रीन टाइम वाढल्याने समस्यांमध्ये वाढ मॅ्नलीहाॅस्पिटलच्या टेक एंड एजिंग लॅबचे प्रमुख इप्सित डाॅ. वाहिया यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांचा स्क्रीन टाइम अनेकवेळेस अन्य समस्यांचे मूळ असतात. जसे की, काहींच्या झाेपेची समस्या ही ऑनलाइन स्कॅमच्या भीतीशी जाेडली गेली आहे. काहींमध्ये नकारात्मक बातम्या पाहिल्याने भीती वाढते.अनेकजण करत नाहीत तक्रार ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्क्रीन टाइममुळे निर्माण झालेल्या समस्या अनेक देशांमध्ये बहुतांशवेळा समाेर येत नाहीत. कारण ते फाेनचे व्यसन लागल्याची तक्रार करत नाहीत. किंबहुना लाेकांना माेबाइलचे व्यसन लागू शकते, ही संकल्पनाही अनेकांना माहीत नाही. वेळ जाण्यासाठी ते याेग्य असल्याचे लाेक मानतात.
स्क्रीन टाइमचे काही फायदेही स्क्रीन टाइमचा प्रत्येक पैलू हा नुकसानदायक नाही. धार्मिक सेवा, ऑनलाइन याेगा्नलास, बुक ्नलब सारख्या गाेष्टींमुळे ज्येष्ठ नागरिक आनंदी राहू शकतात. विशेषतः जे घरातून बाहेर पडू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे वरदान आहे. मेसेजिंग अॅपमुळे कुटुंबाशी संपर्क राहताे. गेमिंग हा वेळ घालविण्याचे साधन बनला आहे.गाणे, व्हिडिओ प्लॅटफाॅर्ममुळे जुन्या आठवणी ताज्या हाेतात.मित्र-परिवाराशी संपर्क वाढताे डाॅ. वाहिया यांनी सांगितले की, किशाेरांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक मजबूत सामाजिक संबंध असतात.स्मार्टफाेनमुळे त्यांच्या नात्यात बाधा येत नाही. तर त्यांना अधिक मजबूत बनवितात. नुकतेच 85 वर्षीय महिला डिप्रेशनने त्रस्त हाेती.डाॅ. वाहिया यांनी व्हर्च्युअल रियलिटीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या लहानपणीचे घर, शाळा दाखविले. त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.