चाणक्यनीती

    15-Dec-2025
Total Views |
 
 

saint 
 
वाच्यार्थ: धर्म, अर्थ, काम, माेक्ष या चार पुरुषार्थांपैकी ज्याच्याजवळ एकही पुरुषार्थ नाही; ताे केवळ मर्त्यलाेकी पुन:पुन्हा जन्म घेऊन पुनह:पुन्हा मरताे. म्हणजे जन्ममरणाच्या ेऱ्यात अडकून पडताे.
 
भावार्थ : मनुष्य जन्माच्या मागे एक विशिष्ट प्रयाेजन आहे.
 
1. धर्म- चांगली कर्मे करून, स्वत:चा विकास साधून, त्याचा उपयाेग जगाला करून देणे हेच मनुष्याचे कर्तव्य असते. धर्म म्हणजेच कर्तव्य. माता-पिता, गुरू, समाज यांचे ऋण ेडण्यातच मनुष्य जन्माचे सार्थक आहे.
 
2. अर्थ - अर्थ म्हणजे धन. सन्मार्गाने धन प्राप्त करणे, स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी त्याचा व्यय करणे हा दुसरा पुरुषार्थ हाेय. धन मिळविणे म्हणजेच धनाचा ‘लाेभ’ ठेवणे नव्हे. पैसा हा माणसासाठी असताे; माणूस पैशांसाठी नव्हे! हे सूत्र जगताना नेहमीच लक्षात ठेवावे.