आपण एखाद्याला भेटायला जाता व केबिनबाहेर बसून वाट पाहावी लागते तेव्हा अस्वस्थपणा सुरू हाेताे. एखाद्या ठिकाणी वेळेवर पाेहाेचयाचे असेल व रस्त्यात ट्रॅफिक जाम हाेते तेव्हा आत उलथापालथ सुरू हाेते. इतरांना पुढे-मागे घुसताना, गाडी नेताना पाहून राग येऊ लागताे. ट्रेन, बसमधून प्रवास करीत असाल व ती उशीरा आली, ज्याची प्रतीक्षा असेल ताे वेळेवर आला नाही तरी माणूस त्रस्त हाेऊ लागताे. या साऱ्या स्थितीत चिड, भय, संशय, अहंकाराला मार, व्यवस्थेवर आक्राेश हे सारे स्वाभाविक रुपात बाहेर पडू लागतात.शिकलेसवरलेले सुशिक्षितही वेड्यासारखे बाेलू लागतात. पण अशा स्थितीत नुकसान आपलेच हाेत असते.व्यवस्थेला नावे ठेवणे, व्यवस्थापकांवर डाफरणे या सर्वांपेक्षा एक विचित्र वातावरण निर्माण हाेते.
ज्यात निगेटिव्ह लहरी वाहात राहतात. जीवनात जेव्हा कधी अशा प्रकारचा प्रतीक्षा काळ येईल धीर अजिबात साेडू नका. जगात खूप काही हाेतच राहात असते. प्रत्येक ठिकाणी आपल्या साेयी पाहता येऊ शकत नाही. मावी चुकांमुळे असे हाेतच असते, निसर्गही आपले रंग दाखवताे. हवामान बिघडले तर ट्रेन लेट हाेते. विमान उशीर शकत नाही. हे सारे निसर्गामुळेचच हाेत असते. जीवनात जेव्हा अशी वेळ येते त्रस्त हाेऊ नका, चिडचिडे हाेऊ नका.परमात्म्याचे विधान मानून ती स्थितीही स्वीकारा. नाहक क्राेध करून स्वत:चे नुकसान करू नका. वाट पाण्याची ती वेळही निघून जाईल व आपण हानी हाेण्यापासून सुरक्षित राहाल.