आपल्या यशाचे श्रेय ईश्वराला देणारा व्य्नती अपयशाच्या कारणांना जाणण्या-समजण्या ऐवजी ईश्वरालाच त्याचा दाेषी मानू लागताे. ज्या मनुष्याला ईश्वराने बनविले आहे, त्याने यशाच्या मार्गाला अजिबात साधासरळ बनविले नाही. त्याला ही गाेष्ट माहिती आहे की, जी त्याची जिवंत रचना आहे, त्याच्या मानसिक बनावटीमध्ये अहंकाराचे तत्त्व अस्तित्वात आहे.म्हणून जीवनात एकत्रित अनेक विराेधी बाजू अस्तित्वात असतात.कसे बाहेर पडाल? वर सांगितलेल्या सर्व स्थितींमध्ये सुद्धा आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी, ईश्वराच्या सत्तेवर पूर्ण श्रद्धा ठेवून आपले कर्म करायला हवे. कदाचित आपले हे वागणे आपले जीवन ऊर्जा आणि स्फूर्तीने भरून टाकील. आपण जास्त विश्वासाने आपल्या मु्नकामाच्या दिशेने जाऊ शकाल.
म्हणून ईश्वराच्या सत्तेवर प्रश्न करणे निरर्थक आहे. वाईट केवळ वाईट लाेकांच्याबराेबर हाेत नाही, वाईट सर्वांच्या बराेबर हाेते. फरक केवळ प्रमाणाचा आहे.ईश्वरावर श्रद्धा कायम हवी आपण जीवनात केल्या जाणाऱ्या कार्यांसाठी असे मानताे की, ईश्वर आपल्या बाबतीत काही वाईट हाेऊ देणार नाही. आपण आपल्या चांगल्या कामांना आपले कवच मानताे.पण आपण हे विसरताे की, ईश्वराने आपल्याला केल्या गेलेल्या कार्यांच्या परिणामांची काही गॅरंटी दिलेली नाही. म्हणून आपण निराशा, अपयश, दुर्घटना यांच्यामध्ये सुद्धा ईश्वराच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता कामा नये.