मेल, एक्स्प्रेसमध्ये पदार्थ विक्रेत्यांना युनिफाॅर्म

    10-Dec-2025
Total Views |
 

uni 
 
खाद्यपदार्थ खरेदी करताना रेल्वे प्रवाशांच्या हाेणाऱ्या लुबाडणुकीला आता लगाम बसणार आहे.रेल्वेच्या मेल, एक्स्प्रेसमध्ये खाद्यपदार्थांची अधिकृत विक्री करणारे ओळखण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम काॅर्पाेरेशनने (आयआरसीटीसी) त्यांच्यासाठी युनिफाॅर्म निश्चित केला असून, दरपत्रकाचे क्यूआर काेड आणि हेल्पलाइन क्रमांक जारी केला असल्याने हा बदल घडणार आहे. प्रवाशांकडून मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे घेण्याच्या तक्रारी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
‘वंदे भारत’ व ‘राजधानी’ यांसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना ‘नेव्ही ब्लू’ या रंगाच्या जॅकेटवर हेल्पलाइन क्रमांकासह युनिफाॅर्म देण्यात येणार आहेत. इतर गाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना हलक्या निळ्या रंगाचे टी-शर्ट देण्यात येतील. त्यांना क्यूआर काेड असलेली ओळखपत्रेही अनिवार्य करण्यात आली आहेत. क्यूआर काेड स्कॅन केल्यावर मेन्यू व अधिकृत दरांची माहिती मिळेल.तसेच, तक्रारींसाठी खास हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध असेल. नवीन प्रणाली ख्रिसमस व नववर्षाच्या सुट्ट्यांपासून सुरू हाेणार आहे. या प्रणालीचा वापर सुरुवातीला मुंबईमधून सुटणाऱ्या गाड्यांत केला जाईल.