गाेष्टी जेवढ्या खासगी राहतात, तेवढे जीवन चांगले असते

    10-Dec-2025
Total Views |
 

thoughts 
 
अशावेळी आपण ज्यांना आपल्या गाेष्टी सांगत आहाेत ते आपल्याला समजून घेतील का व त्यांच्यावर विश्वास टाकता येताे का, याचा एकदाही विचार करत नाही. आपण आपल्या खासगी जीवनापासून लाेकांना जेवढे दूर राखाल, तेवढे जीवन साेपे हाेत जाईल. काेणाला खासगी गाेष्टी न सांगणे का चांगले असते ते पाहू या.
 
इतरांची दखल कमी हाेईल : आपल्या जीवनासंबंधित समस्या व अडचणी जेवढ्या बाहेरच्या लाेकांना सांगाल, तेवढे ते आपल्या जीवनात दखल देऊ लागतील. आपल्या प्रत्येक समस्येत सामील हाेण्याचा प्रयत्न करतील. वारंवार खासगी जीवनासंबंधित प्रश्न विचारतील. त्यांचे आपल्या घरात येणे-जाणे असल्यास काैटुंबिक गाेष्टींतही नाक खुपसण्याचा प्रयत्न करू शकतील. अशावेळी अनेकदा गाेष्टी सावरण्याऐवजी बिघडूनही जातात.
 
गुंता साेडवणे साेपे हाेईल : आपल्या जीवनाशी संबंधित गुंता कसा दूर करावा, हे आपल्यापेक्षा चांगले काेणालाही माहीत नसते; पण जेव्हा आपल्या फ्रेंड वा परिचित गुंता साेडवण्यासाठी आपल्या जीवनात येतील, तेव्हा वेगवेगळे सल्ले देतील. यामुळे याेग्य मार्ग निवडणे कठीण हाेईल आणि गुंता वाढत जाईल. अशावेळी फ्नत त्याच व्य्नतीला समस्या सांगावी, ज्याच्याकडून याेग्य सल्ला मिळण्याची अपेक्षा आहे.
 
विचाराची पर्वा नसेल : जेव्हा एखाद्याला आपल्या खासगी जीवनाविषयी माहीत असते, तेव्हा मनात एक शंका असते की, ती व्य्नती आपल्याबाबत काय विचार करीत असेल. आपल्या स्थितीवर ती हसत तर नसेल ना वा तिने आपल्याविषयी काेणा तिऱ्हाईताला काही सांगितले तर नसेल ना. आपले लक्ष आपल्या समस्येचा उपाय शाेधण्याऐवजी लाेकांच्या विचारांवर केंद्रित हाेते. आपण जेवढ्या कमी लाेकांना आपल्या जीवनाबाबत सांगाल, त्याच्या मताची चिंता तेवढीच कमी हाेईल.
 
अनावश्यक हल्ल्यापासून वाचाल : आजूबाजूला असलेल्या लाेकांचा आपल्याबाबत दृष्टिकाेन कसा आहे, हे आपल्याला माहीत नसते. काहीजण असेही असतात जे समाेर शुभचिंतक असतील; पण आपल्यामागे ते आपल्या यशाचा मत्सरही करतील. जेव्हा आपण आपल्या खासगी गाेष्टी अशा लाेकांना सांगताे, तेव्हा ते त्याला कमजाेरी मानून त्याचा आपल्या विराेधातच वापर करू शकतात. त्यामुळे अशी काेणतीही गाेष्ट काेणालाही सांगू नये ज्यामुळे आपले नुकसान हाेऊ शकेल.