22 नाेव्हेंबर राेजी अमेरिकेतील फ्लाेरिडा येथील लेक वेल्स येथे एक स्काय डायव्हिंग कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता.जगभरातील एकूण 104 स्काय डायव्हर्सनी त्यात भाग घेतला हाेता. या स्काय डायव्हर्सनी वेगवेगळ्या हेलिकाॅप्टरमधून डायव्हिंग करून आकाशात छतासारखा आकार निर्माण केला.या कार्यक्रमाला जागतिक विक्रम म्हणून प्रमाणित करण्यात आले. यापूर्वीचा जागतिक विक्रम 2007 मध्ये 100 जंपर्सनी केला हाेता.हा प्रकल्प 130 लाेकांच्या गटाने वर्षानुवर्षे कठाेर परिश्रम करून साध्य केला. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांच्या पॅराशूटमध्ये न अडकता शेकडाेंच्या संख्येने आकाशात कसे उडायचे, याचा सराव करत हाेते. या स्काय डायव्हिंग कार्यक्रमात सहभागी हाेणाऱ्यांमध्ये तरुणांसह 80 वर्षांचे आजाेबाही हाेते.