राज्य सेवा हक्क आयाेगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सुधाकर बापूराव तेलंग यांना राज्य सेवा हक्क आयाेग आयुक्त, पुणे या पदाची शपथ दिली. काेकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग, माजी आयुक्त दिलीप शिंदे, सचिव वैशाली चव्हाण, तसेच माजी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यावेळी उपस्थित हाेते. माजी आयुक्त दिलीप शिंदे यांनी आयुक्त तेलंग यांचे स्वागत करत, आयाेगाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. संविधानातील मूल्यांची जपणूक करत नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही तेलंग यांनी दिली. राज्य सेवा हक्क आयाेग ही लाेकसेवेची महत्त्वाची यंत्रणा आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे, सेवा वेळेत उपलब्ध करणे आणि शासकीय विभागांत जबाबदारी व पारदर्शकता वाढवण्यास प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.