अन् त्याची धनाकांक्षा पार संपून गेली हाेती म्हणून. आता आणखी थाेडं धन मिळावं अशी काही त्याची आकांक्षा नव्हती.त्यामुळे ताे माेठा धनाढ्य हाेता.आणि ताे धन वाटू शकत हाेता.कारण ज्याची आकांक्षा-मला आणखी थाेडं धन मिळावं अशी-शिल्लक आहे, त्याची काहीच इच्छा शिल्लक नसल्याने ताे वाटू शकत हाेता.एके दिवशी त्याने काही मजूर आपल्या द्राक्षांच्या मळ्यावर पाठवले आणि आणखीही काही मजुरांना गावातून बाेलावून घ्यायला सांगितलं. सूर्याेदयाच्या वेळी काही मजूर मळ्यावर कामासाठी आले; पण तेवढे कमी हाेते. मग त्याने माणूस पाठवून बाजारातून आणखी मजूर आणवले. पण ती माणसं कामावर येईपर्यंत सूर्य चांगलाच वर आला हाेता. डाे्नयावर आला हाेता. दुपारच झाली हाेती. तेवढ्यानंही काम भागणार नव्हतं म्हणून त्यानं आणखी माणसं बाेलावली. ती येईपर्यंत चांगलीच दुपार झाली. इतकंच काय, अगदी संध्याकाळीसुद्धा काही माणसं आली, अगदी सूर्य ढळायच्या वेळी. जेव्हा सूर्यास्तानंतर मजुरी वाटायची वेळ झाली, तेव्हा त्यानं सगळ्या मजुरांना सारखीच मजुरी दिली.