राज्याच्या स्थापनेपासून लाेकप्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आयाम, त्या-त्या काळानुरूप लाेककल्याणाच्या माध्यमातून निर्माण झालेली धाेरणे, राज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागाेवा ‘लाेकराज्य’ मासिकाच्या माध्यमातून वेळाेवेळी सूचिबद्ध झालेला आहे. हा बहुमाेल ऐतिहासिक दस्तावेज आता डिजिटल फाॅरमॅटमध्ये अंकनिहाय उपलब्ध हाेत असून, लवकरच ताे गुगल व इतर प्लॅटफाॅर्मद्वारे वाचक व अभ्यासकांपर्यंत पाेहाेचवू, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘लाेकराज्य’च्या दुर्मीळ अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर डिजिटल स्वरूपात उपलब्ध केलेल्या 50 दुर्मीळ अंकांचे लाेकार्पण ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभारी उपसचिव अजयभाेसले, संचालक (माहिती) (प्रशासन) किशाेर गांगुर्डे, नागपूर विभागाचे संचालक (माहिती) गणेश मुळे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गाेविंद अहंकारी, कक्ष अधिकारी युवराज साेरेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विनाेद रापतवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.राज्यातील लाेकप्रशासन, राज्यपातळीवर घेतलेल्या विविध धाेरणात्मक निर्णयांबद्दल देशात आकर्षण आहे. राज्यशास्त्र, इतिहास या ज्ञानशाखांतील संशाेधकांसाठी राज्याच्या उभारणीत, जडणघडणीत कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लाेकराज्यच्या अंकाद्वारे देण्यात आली. ही जडणघडण व यातील पाऊलखुणा प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध करून देऊ, असे ब्रिजेश सिंह यांनी स्पष्ट केले.