राज्यात मुले, तसेच महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या काळात अनेक नवीन याेजना, उपक्रम आम्ही सुरू केले.राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सर्व करू.याबाबतीत काेणतीही तडजाेड केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.राज्य महिला आयाेगाने वनामतीत आयाेजिलेल्या ‘सक्षमा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना शिंदे बाेलत हाेते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर, आयाेगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार मनीषा कायंदे, आमदार चित्रा वाघ, विक्रम काळे, मंजुळा गावित, सना मलिक, आयाेगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवळे आदी उपस्थित हाेते.
केंद्र आणि राज्य शासनाने महिलांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. भारतीय न्याय संहितेद्वारे महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. हे कायदे व त्यातील तरतुदी महिलांपर्यंत पाेहाेचल्या पाहिजेत. ङ्गसक्षमाफ कार्यक्रमातून या तरतुदी महिलांपर्यंत पाेहाेचतील, असा विश्वास अॅड. नार्वेकर यांनी व्यक्त केला. तटकरे, साकाेरे-बाेर्डीकर, चित्रा वाघ यांनी मनाेगत व्यक्त केले.