चाणक्यनीती

    10-Dec-2025
Total Views |
 

saint 
 
थापटून-थाेपटून एखाद्या घड्याला आकार द्यावे तसे.अर्थाने तेही प्रमाणाबाहेर झाले तर मुले काेडगी बनतात; कारण या वयात उनाडपणे वागून ताे बिघडूही शकताे.त्याला धाकात ठेवले तर ताे सरळ वागेल. या वयातही केवळ लाडच झाले तर मुलगाही त्याचा गैरायदा घेऊन हेकेखाेर, हट्टी बनू शकताे; वाया जाऊ शकताे.या वयात त्याच्या चुकांबद्दल त्याला शिक्षा झाल्यास कसे वागू नये हे त्याला कळते-शहाणपण येते.
 
3. पाैगंडावस्था - साधारणपणे मुलांची पाैगंडावस्था (किशाेर वय ते युवावस्था असा प्रवास) साेळाव्या/सतराव्या वर्षी सुरू हाेते. (मुलींची वाढ मुलांपेक्षा लवकर हाेते.) या वयात त्याच्या शरीरात, मनात खूपच बदल हाेतात. काय हाेते आहे, हे त्याला कळत नाही; पण मनात मात्र गाेंधळ माजताे. अशावेळी त्याच्या वागण्यात एकतर संकाेच येताे नाहीतर बेदरकारपणा, उर्मटपणा येताे. काही वेळेला केवळ आई-वडील विराेध करतात म्हणून तेच करायचे, अशी बंडखाेर वृत्तीही निर्माण हाेते.