कापरामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे शरीर आणि मन दाेन्ही तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.याशिवाय विविध समस्यांमध्ये कापूर कसा वापरावा, हेही समजून घेणं आवश्यक आहे.जाणून घेऊ, कापरापासून काेणकाेणते फायदे मिळतात, ज्याबद्दल आपण आतापर्यंत अनभिज्ञ आहाेत.
तणाव दूर करताे : कापराचा सुगंध मनाला शांत करताे. जर तुम्हाला जास्त ताण येत असेल तर, एका भांड्यात कापूर ठेवा आणि खाेलीत ठेवा.यामुळं तणाव दूर हाेईल आणि तुम्हाला बरं वाटेल.शिवाय, तुम्हाला रात्री चांगली झाेपही लागेल.
डाेकेदुखी दूर करताे : डाेकेदुखीचा त्रास झाल्यास कापूर, शुंथी, अर्जुन वृक्षाची साल आणि पांढरं चंदन समप्रमाणात बारीक करून कपाळावर लावावं. थाेडा वेळ तसंच पडून रहावं. या उपायानं तुम्हाला भरपूर आराम मिळेल.स्नायू वेदना आणि खाेकल्यामध्ये आराम...स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी कापूर देखील उपयुक्त मानला जाताे. यासाठी माेहरीच्या तेलात कापूर टाकून नियमितपणे शरीराची मालिश करावी.खाेकला झाल्यास या तेलानं छाती आणि पाठीला मालिश करा. तुम्हाला भरपूर विश्रांती मिळेल. तुम्ही माेहरीऐवजी तिळाचं तेलही वापरू शकता.
सर्दी झाल्यास : गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्यानं खूप आराम मिळताे.त्वचेसाठी : खाेबरेल तेलात कापूर मिसळून ते नियमितपणे त्वचेवर लावावं. यामुळे त्वचेवरील डाग दूर हाेतात आणि त्वचा स्वच्छ हाेते. पण जर त्वचा तेलकट असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर हे करा.
काळे केस : खाेबरेल तेलात कापूर मिसळून केसांमध्ये लावल्याने काेंड्याची समस्या दूर हाेऊन केस काळे राहतात.हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या खूप सामान्य आहे. अशा स्थितीत कापूर तेलात पाणी मिसळा आणि त्यात काही वेळ पाय ठेवा. यानंतर पाय पुसून क्रीम किंवा तेल लावा. यामुळे तुम्हाला काही दिवसांत आराम मिळेल.