कृत्रिम बुद्धिमत्तेची वेगाने वाढणारी क्षमता आता थेट राेजगारावर हल्ला करू शकते. जगातील आघाडीचे एआय तज्ज्ञ स्टुअर्ट रसेल यांनी इशारा दिला आहे की, येत्या काळात 80 टक्के नाेकऱ्या गमावल्या जाऊ शकतात आणि एआय देखील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारू शकते. त्यांच्या मते, एआय सिस्टीम आज जवळ जवळ प्रत्येक गाेष्ट मानवापेक्षा वेगवान आणि चांगले करू शकते.या विधानामुळे तंत्रज्ञान उद्याेग आणि सामान्य जनतेच्या भविष्याबद्दल चिंता आणि वादविवाद दाेन्ही निर्माण झाले आहेत. स्टुअर्ट रसेल यांनी डायरी ऑफ अ सीईओ पाॅडकास्ट मध्ये म्हटले आहे की, येत्या काळात 80 टक्के नाेकऱ्या गायब हाेऊ शकतात. त्यांचा असा विश्वास आहे, की आधुनिक एआय सिस्टीम अशा गाेष्टी करतात, ज्या आपण मानवी कार्य मानताे. एआय काेडिंगपासून निर्णय घेण्यापर्यंत वेग आणि कार्यक्षमतेत मानवाला मागे टाकत आहे. हा बदल जागतिक अर्थव्यवस्थेला माेठा धक्का देऊ शकताे.