बालपणातच आपल्या मुलांचे यशस्वी तरुण मन बनवा

    01-Dec-2025
Total Views |
 

thoughts 
 
लहानपणी छाेट्या-माेठ्या गाेष्टींचा आनंद घेणारी मुले बऱ्याचदा तरूण हाेता हाेता छाेट्या छाेट्या समस्या पाहून घाबरू लागतात. कित्येकदा तर एवढे त्रस्त हाेतात की, गंभीर तणाव व डिप्रेशनचे शिकार हाेतात. अर्थात त्यांना मानसिक रुपात सशक्त बनवण्याची जबाबदारी संगाेपनातील सर्वांत माेठे कर्तव्य आहे. यासाठी काेणत्या मुद्यांकडे लक्ष द्यावे हे या टिप्समधून जाणून घेऊ या.घरातील वातावरणाचा परिणाम कुटुंबाकडून मुलांना पहिले व महत्त्वाचे सामाजिक वातावरण मिळते. एक सुरक्षित, जिव्हाळ्याचे व समजुतदारपणाचे काैटुंबिक वातावरण मुलाच्या मानसिक आराेग्याला प्राेत्साहित करते. यासाठी पालकांनी मुलांसाेबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. त्यांच्या भावना समजून घेऊन माेकळेपणाने संवाद साधावा. काेणतेही काैटुंबिक वाद मुलांपर्यंत पाेहाेचू देऊ नयेत.
त्यांच्यासमाेर वाद घालू नयेत.सकारात्मक आधाराने वाढेल आत्मविश्वास मुलांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा विकास खूप महत्त्वाचा असताे. यासाठी त्यांच्या यशाचे काैतुक करा.
 
जेव्हा मुले चूक करतील वा अपयशी हाेतील तेव्हा त्यांच्यावर टिका करण्याऐवजी त्यांना प्राेत्साहित करा. अपयशही जीवनाचा भाग असल्याचे व त्यातून अनुभव मिळत असल्याचे त्यांना सांगा.सर्वांत महत्त्वाचे असते प्रयत्न करणे.समाजाशी जवळीक हाेईल मुलांना सामाजिक काैशल्यांची ओळख करवणे आवश्यक आहे. यामुळे ते लाेकांशी उत्तमप्रकारे संवाद व व्यवहार करण्यात सक्षम हाेतात. पालकांनी आपल्या मुलांना इतर मुलांसाेबत मिळून मिसळून काम करायला, समस्यांचे निवारण सामाजिक स्थितीचा सामना करायला शिकवावे. एखादा मित्र उदास असेल तर त्याच्याशी थाेडा वेळ बाेलणे वा एखाद्या मित्राला मदत करणे त्यांना शिकवावे.स्वातंत्र्य व जबाबदारीचा ताळमेळ मुलांची बेफिकीरी फक्त चिंतामुक्त हाेण्यापुरती राहावी हे उत्तम. त्यांना जबाबदारींपासून दूर करू नये.स्वातंत्र्य व जबाबदारीत ताळमेळ राखायला शिकवावे. त्यांना अशी कामे द्यावीत जी त्यांना स्वावलंबी बनवतील.
 
सक्रियतेने वाढतील अनेक काैशल्ये मुलांचे मानसिक आराेग्य सुधारण्यात शारीरिक व मानसिक सक्रियेतेचा माेठा वाटा असताे. खेळ, याेग, नृत्य अशा शारीरिक क्रिया मुलांचा मानसिक ताण कमी करण्यास मदत करील.तसेच वाचन-लिखाण, संगीत, कला आणि क्राफ्ट या क्रिया रचनात्मकता व समस्या-निवारणाचे काैशल्य वाढवतील.शिस्त भीती नव्हे गुण बनवा शिस्त मुलांसाठी आवश्यक आहे, पण ती मुलांवर लादू नये. घरात अजागळ, अस्ताव्यस्त जीवन जगणारी मुले शिस्तबद्ध जीवनशैलीचा धडा शिकू शकत नाहीत. आपण आचरणाचा आदर्श हाेऊनच मुलांना अनुकरण करणे शिकवू शकता. सकारात्मक पद्धतीने लावलेल्या सवयी शिस्तीचा भाग वाटत नाही.यामुळे ती स्वावलंबी हाेऊन आव्हाने स्वीकारू लागतील.समर्थनातून येईल भावनिक सामर्थ्य मुलांसाठी भावनिक समर्थन महत्त्वाचे असते. मुलांनी त्यांच्या भावना स्वतंत्रपणे व्यक्त करायला हव्यात. जेव्हा मुले उदास व त्रस्त असतात तेव्हा त्यांचे ऐकावे व त्यांना सहानुभूती दाखवा. आपण मुलांसाेबत नेहमी आहाेत ही जाणीव त्यांना देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. यामुळे मुलांना जेव्हा त्रास हाेईल तेव्हा ते ती आपल्याला येऊन सांगतील.