कमी मूळ वेतन असलेल्यांनाच ओव्हरटाइमसाठी प्राधान्य

    01-Dec-2025
Total Views |
 

ST 
 
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दैनंदिन उत्पन्नाचा ताळमेळ साधण्यासाठी ओव्हरटाइम (अतिकालीन) ड्युटीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चालक आणि वाहकांच्या ‘ओव्हरटाइम भत्त्या’च्या नियमावलीत माेठे बदल केले आहेत. यापुढे ओव्हरटाइम देताना ‘कमी मूळ वेतन’ असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत; तसेच, ठरावीक कर्मचाऱ्यांनाच जास्त ओव्हरटाइम दिला जात असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.एसटीच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) या संदर्भातील परिपत्रक सर्व विभाग नियंत्रकांना जारी केले आहएसटीच्या आर्थिक उत्पन्नात तफावत वाढते आहे. त्यामुळे दैनंदिन उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत अतिकालीन भत्त्याबाबत हाेणाऱ्या खर्चावर नियंत्रण नसल्याचे समाेर आले. याबाबत कामगारांकडून अनेक तक्रारी येत असून, मर्जीतील काही ठरावीक चालक, वाहकांनाच हा अतिकालीन भत्ता दिला जाताे.
 
त्या बदल्यात आर्थिक देवाणघेवाणही हाेते,असे आराेप करण्यात आले हाेते. या पार्श्वभूमीवर अतिकालीन भत्त्यासंदर्भात ‘प्रमण कार्यपद्धती’ वापरली जावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने आता खर्चात काटकसर करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत.काटकसरीच्या उपायांसाेबतच, वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठाेर कारवाईचे निर्देशही देण्यातआले आहेत. गर्दीच्या दिवशी किंवा सणासुदीला रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रजेच्या कलाचा अभ्यास करून अशा प्रकारांना आळा घालण्यास सांगण्यात आले आहे; तसेच, सतत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.ओव्हरटाइम वाटपात काेणताही भेदभाव हाेऊ नये, यासाठी प्रत्येक आगारात एका विशिष्ट नमुन्यात स्वतंत्र नाेंदवही ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या नाेंदवहीत कर्मचाऱ्याचे नाव, बिल्ला क्रमांक, ओव्हरटाइमचा प्रतितास दर आणि रक्कम याची नाेंद ठेवावी लागेल. ठरावीक कर्मचाऱ्यांनाच जास्त ओव्हरटाइम दिला जात असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.