डाॅ. प्रज्ञा कापसे यांची आजपासून दिलखुलासमध्ये विशेष मुलाखत

    01-Dec-2025
Total Views |
 

Interview 
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘मानसिक आराेग्य आणि ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर रा. आ. पाेदार आयुर्वेद मेडिकल काॅलेजच्या शल्यतंत्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डाॅ. प्रज्ञा कापसे यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत राेज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर, तसेच ङ्गछशुी ेप अखठफ या माेबाईल अ‍ॅपवर प्रसारित हाेईल. ही मुलाखत निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतली आहे.आजच्या धावपळीच्या जगात, ताणतणाव दैनंदिन जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर तणाव ओळखून त्याचा याेग्य पद्धतीने सामना करणे गरजेचे आहे.
 
दैनंदिन जीवनातील ताण कमी करण्यासाठी वेळेचे नियाेजन, नियमित व्यायाम, ध्यान-श्वसनक्रिया, संतुलित आहार, पुरेशी झाेप आणि आवश्यकतेनुसार समुपदेशनाचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने राज्य शासन मानसिक आराेग्याशी संबंधित सेवांचा विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, शाळा, महाविद्यालये, तसेच कामकाजाच्या ठिकाणी मानसिक आराेग्य जनजागृतीच्या उपक्रमांना प्राेत्साहन देत आहे. नागरिकांनी आपले ममानसिक आराेग्य आणि ताणतणाव व्यवस्थापनफ कसे करावे, आहार कसा असावा आणि काय काळजी घ्यावी, याबाबत डाॅ. कापसे यांनी दिलखुलासमधून माहिती दिली आहे.