मुंबई, ठाण्यातील उड्डाणपुलांची देखभाल महापालिकांकडे दिली

    30-Nov-2025
Total Views |
 

ss 
 
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत बांधण्यात आलेले 34 उड्डाणपूल देखभालीसाठी या महापालिकांकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.सात दिवसांत ते ताब्यात घेण्याचे आदेश संबंधित महापालिकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील 34 उड्डाणपुलांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित महापालिकांकडे असेल.मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक काेंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसीने 1196 मध्ये 55 उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार 34 उड्डाणपूल बांधले. यात मुंबईतील 27 उड्डाणपुलांचा समावेश आहे. या उड्डाणपुलांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सध्या एमएसआरडीसी वा संबंधित पथकर वसुली कंत्राटदारावर आहे.
 
पावसाळ्यात उड्डाणपुलावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर हाेताे. मुंबईतरस्त्यांवर आणि उड्डाणपुलावर खड्डे दिसतात. यावरून विविध सरकारी यंत्रणांत वादही हाेताे. मुंबईत यावरून महापालिकेला टीकेला सामाेरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर आता महामुंबईत एमएसआरडीसीने बांधलेले 34 उड्डाणपूल पालिकांकडे देखभालीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध केला जाणार आहे.एमएसआरडीसीचे 27 उड्डाणपूल मुंबई पालिकेकडे, ठाण्यातील 3 उड्डाणपूल तेथील महापालिकेकडे, तर नवी मुंबईतील 4 उड्डाणपूल नवी मुंबई महापालिकेकडेदेखभालीसाठी देण्यात येणार आहेत.सात दिवसांत आहे त्या स्थितीत संबंधित पालिकांनी उड्डाणपूल देखभालीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.