आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत

    30-Nov-2025
Total Views |
 

Kumbh 
 
आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार साडेपाच हजार काेटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मान्यता मिळालेली सर्व कामे एकमेकांशी समन्वय साधून जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयु्नत डाॅ. प्रवीण गेडाम यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयु्नत शेखर सिंह, विशेष पाेलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महापालिका आयु्नत मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचेमुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पाेलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महापालिकेचे अतिर्नित आयु्नत प्रदीप चाैधरी, उपायु्नत स्मिता झगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गाेवर्धने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साेनल शहाणे, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनाेज डाेकचाैळे, सहसंचालक लेखा व काेषागारे बाबुलाल पाटील, पाेलीस उपायु्नत किरणकुमार चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते.
 
प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या रस्त्यांची कामे करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वन विभाग, पाेलिस व इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा. कामे विहित मुदतीत करताना कामाच्या दर्जाकडेही लक्ष द्यावे. नाशिक-त्र्यंबकेश्वरसहापदरी रस्ता तयार करताना दाेन्ही बाजूंनी पादचारी मार्गाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना डाॅ. गेडाम यांनी दिल्या.नाशिक महापालिका व सर्व संबंधित यंत्रणांनी प्राप्त प्रशासकीय मान्यतेनुसार मलनि:स्सारण प्रकल्प, पाणीपुरवठा याेजना, सीसी टीव्ही व ऑप्टिकल फायबर, अग्निशमन यंत्रणा या कामांना प्राधान्य द्यावे.साधुग्राम आराखड्यात कुंभकाळात भाविकांसाठी प्रदर्शने, मनाेरंजनात्मक कार्यक्रमांचे नियाेजन करावे.राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने ओझर विमानतळ विस्तारीकरण आराखड्यातील अधिक कालावधी लागणारी कामे प्राधान्याने सुरू करण्याच्या सूचनाही डाॅ. गेडाम यांनी दिल्या.