
मध्य रेल्वेकडून जळगाव-मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या मार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले हाेते.अखेर 160 किमी.च्या या रेल्वे मार्गाची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे.जळगावहून मनमाडपर्यंत नव्याने कार्यान्वित झालेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गामुळे मुंबई- हावडा मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक आता अधिक वेगवान हाेऊ शकणार आहे.जळगाव ते मनमाड मार्गावरील गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे अनेक वेळा रेल्वे मार्ग व्यस्ततेचे प्रमाण जास्त असते. गाड्यांना मध्येच सेक्शनमध्ये स्नतीचा थांबा घ्यावा लागताे. परिणामी, दिवसभरात अनेक गाड्यांचे वेळापत्रक काेलमडते. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दिशेने जळगाव-मनमाडदरम्यान 160 कि.मी. अंतरात तिसऱ्या रेल्वे मार्गाचे नियाेजन करण्यात आले हाेते. एकूण चारटप्प्यांत हाती घेण्यात आलेल्या या मार्गात 304 लहान व 22 माेठे पुलांची उभारणी केली आहे.
हा प्रकल्प मार्च 2024 पर्यंत पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. प्रत्यक्षात अनेक अडचणींमुळे त्याची तांत्रिक व वेग चाचणी दीड वर्ष उशिराने झाली.पहिल्या टप्प्यात जळगाव ते पाचाेरादरम्यानचे काम मार्गी लागल्यानंतर र्वरित टप्प्यातील कामांना रेल्वे प्रशासनाने गती दिली. त्यानुसार पिंपरखेड ते नांदगाव या 104 कि.मी. अंतरातील अखेरच्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. पूर्णत्वास आलेल्या कामांची पाहणी मुख्य सुरक्षा आयु्नत मनाेज अराेरा यांनी केल्यानंतर अंतिम चाचणीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुरक्षा निरीक्षण आणि इलेक्ट्रिक लाेकाेच्या माध्यमातून वेग चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान सुमारे 131 कि.मी.ची कमाल मर्यादा रेल्वेने गाठली.
या प्रसंगी मुख्य प्रशासकीय अधिकारी अविनाश पांडे, भुसावळ मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.जळगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गात अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. 11 आधुनिक इलेक्ट्राॅनिक इंटरलाॅकिंग प्रणालींसाेबतच 16 ब्लाॅक विभागांमध्ये बीपीएस प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सात बाय 18.3 मीटरचे कंपाेझिट गर्डर असलेला महत्त्वपूर्ण पूल तिसऱ्या मार्गाबराेबरच नियाेजित चाैथ्या मार्गासाठीही तयार ठेवण्यात आला आहे.त्यामुळे भविष्यातील रेल्वे विस्तारासाठी नव्याने भूसंपादनाची गरज भासणार नाही.