मतदार यादीत चुका दिसल्यास कर्मचाऱ्यांना थेट निलंबित करणार

    29-Nov-2025
Total Views |
 

MN 
 
महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयु्नत जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मतदार याद्यांमधील चुका ही गंभीर बाब असून, त्या दुरुस्त करण्याची संधी आहे. त्यानंतरही चुका निदर्शनास आल्यास थेट निलंबन करण्यात येईल, असा इशारा आयु्नतांनी दिला.महापालिकेने गेल्या आठवड्यात मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. या याद्या पाहून इच्छुक उमेदवारांच्या पायाखालची वाळूच घसरू लागली. यादीत घाेळ असल्याचे समाेर येऊ लागले. निवडणूक आयाेगानेच महापालिकेला यादी देताना 58117 मतदारांची नावे दुबार असल्याचे सांगितले. या नावांचा शाेध घेण्याची जबाबदारीही पालिकेवर आहे.दरम्यान, बैठकीत आयु्नतांनी तीव्र शब्दांत चुकांबद्दल नाराजी व्य्नत केली.
 
चुकांना माफी दिली जाणार नाही, थेट घरी पाठवण्यात येईल. प्रत्येक भागात फिरून मतदारांच्या नावांची, त्यांच्या निवासस्थानांची शहानिशा करावी, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.महापालिका हद्दीत 1300 मतदान केंद्रे राहतील. प्रत्येक मतदान केंद्राची वाॅर्ड अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, तेथील साेयी-सुविधांचा आढावा घ्यावा, सुविधा नसतील तर त्या उपलब्ध करून देण्यासाठीचे नियाेजन करावे, अशी सूचना आयु्नतांनी केली.प्रत्येक वाॅर्ड कार्यालयात मतदार यादीमधील मतदारांची नावे शाेधून देण्यासाठी दाेन कर्मचारी नेमून देण्यात येणार आहेत, हेल्प डेस्कच्या माध्यमातून हे कर्मचारी मतदारांची नावे व त्यांचा प्रभाग शाेधून देतील, असे त्यांनी सांगितले.