मुंबई, ठाण्यातील नऊ मेट्राेंसाठी 500 काेटींचे कर्ज वितरितं

    29-Nov-2025
Total Views |
 

Metro 
 
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मुंबईपासून ठाण्यापर्यंतच्या नऊ मेट्राे प्रकल्पांसाठी सरकारने 500 काेटींचे बिनव्याजी कर्ज वितरित केले आहे.नगर विकास विभागाकडून एमएमआरडीएला दहिसर, मिरा राेड, ठाणे कल्याणपर्यंतच्या विविध मार्गांवरील नऊ मेट्राे प्रकल्पांसाठी हे कर्ज वितरित करण्यात आले. यात केंद्राचा 50 ट्नकेकर; तसेच 100 ट्नके स्थानिक कर आणि जमिनीच्या खर्चांसाठी हे कर्ज देण्यात आले आहे.मुंबई मेट्राे लाइन (5) ठाणे-कल्याण- भिवंडी या मेट्राे प्रकल्पासाठी 1352 काेटी 25 लाखांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 52 काेटी 38 लाख 60 हजार रुपये दुय्यम कर्जाच्या स्वरूपात वितरित करण्यास नगर विकास विभागाने मान्यता दिली.
 
मुंबई मेट्राे लाइन (6) स्वामी समर्थ नगर, जाेगेश्वरी-विक्राेळी या प्रकल्पासाठी 32 काेटी 95 लाख 20 हजार रुपये, मुंबई मेट्राे मार्ग (2 अ) दहिसर पूर्व-डी एन नगर प्रकल्पासाठी 28 काेटी 89 लाख 70 हजार रुपये, मुंबई मेट्राे (2 ब) डी एन नगर-मंडाले प्रकल्पासाठी 112 काेटी 80 लाख रुपये, मुंबई मेट्राे मार्ग (4) वडाळाघाटकाेपर-मुलुंड-कासारवडवली आणि मुंबई मट्राे मार्ग (4 अ) कासारवडवली ते गायमुख प्रकल्पासाठी 98 काेटी 72 लाख 80 हजार रुपये, मुंबई मेट्राे (7) अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व प्रकल्पासाठी 49 काेटी 63 लाख 20 हजार रुपये, मुंबई मेट्राे (9) दहिसर ते मिरा राेडा आणि मार्ग (7 अ) अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 66 काेटी 71 लाख 40 हजार रुपये, गायमुख ते शिवाजी चाैक मिरा राेड प्रकल्पासाठी 86 काेटी 14 लाख 80 हजार रुपये आणि मुंबई मेट्राे मार्ग (12) कल्याण ते तळाेजा प्रकल्पासाठी 1 काेटी 8 लाख 90 हजारांचा निधी दुय्यम कर्जाच्या स्वरूपात वितरित करण्यात आला. असे एकूण 498 काेटी 74 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.