दिलखुलास आणि जय महाराष्ट्रमध्ये रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत

    29-Nov-2025
Total Views |
 

Interview 
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमात हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर 350 व्या शहिदी समागमनिमित्त हिंददी-चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी 350व्या शहिदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत शनिवारी (29 नाेव्हेंबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. ही मुलाखत न्यूज ऑन एआयआर या माेबाइल अ‍ॅपवरही उपलब्ध आहे. जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारी (2 डिसेंबर) रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे; तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही पाहता येईल. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला 350 वर्षे पूर्ण हाेत आहेत. या निमित्ताने नागपूर, नवी मुंबई आणि नांदेडमध्ये अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग, महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूर साहिबजी 350 वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या विद्यमाने विविध कार्यक्रम आयाेजिण्यात आले आहेत. 7 डिसेंबरला नागपूरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ, 21 डिसेंबरला नवी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तर 24 जानेवारीस नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम हाेणार आहे. या कार्यक्रमांचे स्वरूप व राबवण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी नाईक यांनी या कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.