युनेस्काे मुख्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण

    28-Nov-2025
Total Views |
 

UN 
 
महाराष्ट्र शासनाने युनेस्काेच्या मुख्यालयाला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट दिला हाेता.या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याने युनेस्काेच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात संविधान दिनीच डाॅ. आंबेडकर यांचा पुतळा दिमाखात उभा राहिला.महाक्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्काेशी संबंधित सर्व पदाधिकारी,वरिष्ठाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.‘महामानव डाॅ. आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेने आणि प्रतिभेने जगाला समता- बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली.भारताला मिळालेले संविधान हे त्यांच्या उत्तुंग अशा कर्तृत्वाचा आविष्कार आहे.
 
डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनीच अनावरण हे जगातील सर्वांत माेठ्या लाेकशाही राष्ट्राला मिळालेल्या संविधानाप्रति व्यक्त झालेला परमाेच्च आदराचा क्षण आहे. आम्ही हा क्षण महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने डाॅ. आंबेडकर यांच्याप्रतिअभिवादनाचसंधी मानताे. पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि हा पुतळा उभा राहावा, यासाठी प्रयत्नशील अशा सर्वांचे अभिनंदनही करताे.यानिमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देताे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.युनेस्काेच्या मुख्यालयात युनेस्काेचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. याप्रसंगी भारताचे युनेस्काेतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित हाेते.महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच डाॅ. आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी आणि त्याचे संग्रहालयात रूपांतर केले आहे. जपानमधील काेयासान विद्यापीठातही डाॅ. बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला आहे.