तुला

    23-Nov-2025
Total Views |
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी संतुलन व समजुतदारपणाचा काळ आहे. कार्यक्षेत्रात तुमचे परिश्रम व तर्क अनेक समस्या साेडवतील. त्यामुळे अनेक जुनी कामे मार्गी लागतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा फायदा मिळवून देणारा असेल. पूर्ण माहिती मिळवूनच काेणत्याही प्रकारची गुंतवणूक करावी.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे फळ देण्याची श्नयता आहे. तुमच्या कार्यकुशलतेवर तुमचे वरिष्ठ व सहकारी खूश असतील. व्यापारी वर्गासाठी जुन्या व्यवहारातून फायदा हाेण्याची श्नयता आहे. भागीदारी फायदेशीर ठरू शकते.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्यजीवनात माधुर्य येईल.कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहित मंडळींसाठी या आठवड्यात उत्तम स्थळ चालून येईल. तसेच लवकरच विवाह हाेण्याचेही याेग आहेत.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्यसुखाबाबत बाेलायचे तर ते सामान्य राहील.तुम्हाला काहीसा थकवा जाणवेल तसेच मानसिक ताणही असेल. मान, पाठ, व खांद्यात चमक व वेदना राहील. तुम्ही संतुलित आहार घ्यायला हवा तसेच पुरेशी झाेप व हलकासा व्यायाम करायला हवा.
 
 शुभदिनांक : 24, 25, 29
 
 शुभरंग : जांभळा, हिरवा, क्रीम
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : आर्थिक देवघेवीत घाई करू नये. काेणत्याही वादात संयम राखावा.
 
 उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीमातेला कमळ व पांढरी मिठाई अर्पण करावी. ॐ श्रीं महालक्ष्म्यै नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा. गरजूंना अन्न व वस्त्रदान करावे.