वृषभ

    23-Nov-2025
Total Views |

Horoscope 
या आठवड्यात तुमच्यासाठी स्थैर्य व सतर्कतेचा काळ राहील. कार्यक्षेत्रात तुम्ही तुमच्या अनुभवाने महत्त्वाचे निर्णय घ्याल. काही जुन्या प्रोजेक्ट्सवर पुनर्विचार करावे लागू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची स्तुती करतील. व्यापाऱ्यांना. नवे सौदे व ग्राहक फायदेशीर ठरतील.
 
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक मोर्चावर आपली दक्षता व धोरण फायदेशीर ठरेल. नोकरदारांना एखाद्या कठीण समस्येतून मार्ग काढण्यात यश मिळेल. व्यापाऱ्यांसाठी जुने करार फायदेशीर ठरतील. तसेच नवे संपर्क मिळतील. कोणतीही नवी गुंतवणूक करताना घाई टाळावी.
 
■ नातीगोती : या आठवड्यात तुमच्या कौटुंबिक जीवनात व प्रेमजीवनात माधुर्य राहणार आहे. अविवाहित मंडळींसाठी नवी स्थळे चालून येण्याची शक्यता आहे. तसेच लग्नाचे योग जुळून येण्याचीही शक्यता आहे. संवादात पारदर्शकता राखावी आणि वादात संयम बाळगावा.
 
■ आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील. तुम्ही वाहन चालवताना दक्षता बाळगावी. मान, पाठ, खांदे दुखू शकतात. ध्यान व श्वासोच्छवास तंत्र जोपासून मानसिक शांती राखू शकाल. सोबत संतुलित आहार, पुरेशी झोप व नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.
 
■ शुभदिनांक : २४, २५, २९शुभरंग : जांभळा, हिरवा, क्रीम
 
■ शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
■■ दक्षता : या आठवड्यात आर्थिक देवघेवीत घाई करू नये व व्यवहारात
संयम राखावा.
 
■ उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीमातेला कमळ व शुभ्र मिठाई अर्पण करावी. ॐ महालक्ष्म्यै नमः मंत्राचा जप १०८ वेळा करावा.