धनु

    23-Nov-2025
Total Views |
 

Horoscope 
या आठवड्यात तुमच्यासाठी सावधपणा व संधी दाेन्ही महत्त्वाचे असेल. जुनी कामे व्यवस्थित पार पाडल्यामुळे तुम्हाला नवी जबाबदारी मिळण्याची श्नयता आहे. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा लाभदायक राहणार आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व पैलूंचे विश्लेषण करावे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या धाेरणांचे व वक्तशीर प्रयत्नांचे वरिष्ठ अधिकारी काैतुक करतील. एखाद्या प्राेजे्नटमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. व्यापाऱ्यांना जुन्या व्यवहारांमधून फायदा हाेईल. काेणतीही गुंतवणूक वा भागीदारी करण्यापूर्वी कागदपत्रे व अटी व्यवस्थित पाहून घ्या.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात व काैटुंबिक जीवनात सहकार व समजुतदारपणा राहील. तुम्हीही तुमच्या संवादात पारदर्शकता व संयम राखायला हवा. वाद वा मतभेदाच्या स्थितीत धैर्य व हुशारीने वागायला हवे. कुटुंब व मित्रांसाेबत वेळ घालवल्यामुळे आठवडा सुखात जाईल.
 
 आराेग्य : या आठवड्यात जरी तुम्हाला काहीसा थकवा वा मानसिक दाब जाणवला तरी आराेग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहील. संतुलित आहार, पुरेशी झाेप व नियमित व्यायामाद्वारे तुम्ही तुमचे आराेग्य उत्तम राहील.
 
 शुभदिनांक : 23, 26, 28
 
 शुभरंग : लाल, साेनेरी, पांढरा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात आर्थिक व्यवहारात विशेष सावध राहावे काेणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते व्यवस्थित वाचावा.
 
 उपाय : या आठवड्यात गुरुवारी श्रीविष्णूला पिवळे फूल व हळद अर्पण करावी. ॐ नमाे नारायणाय मंत्राचा 108 वेळा जप करावा.