राम मंदिरात पॅराशूट कापडाचा धर्मध्वज

    23-Nov-2025
Total Views |
 
 
 

Ram
 
25 नाेव्हेंबर राेजी अयाेध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात हाेणाऱ्या भव्य ध्वजाराेहण समारंभाची तयारी जाेरात सुरू आहे. राम मंदिरासह संकुलातील आठ मंदिरांमध्ये धार्मिक ध्वजाराेहण केले जाईल. हा धर्मध्वज मजबूत पॅराशूट कापडापासून बनवला जाणार असून, ताे वारा, वादळ किंवा साेसाट्याच्या वाऱ्यांना ताेंड देऊ शकेल.लष्करी पथकाने दिलेल्या सूचनेनुसार, पॅराशूट कापडापासून धर्मध्वज बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिराचा मुख्य ध्वजस्तंभ 360 अंशांवर फिरणाऱ्या बाॅल बेअरिंग सिस्टमवर आधारित असेल. ज्यामुळे ताे ताशी 60 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना ताेंड देऊ शकेल. अयाेध्येच्या मंदिर संकुलात 17 मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुख्य राम मंदिर, परकाेटाची सहा मंदिरे, सप्तमंडपाची सात मंदिरे, शेषावतार मंदिर यांचा समावेश आहे.मंदिर संकुलात तुलसीदास, जटायू आणि खिस्काेली यांच्या सुंदर मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.मंदिरांवर फडकवल्या जाणाऱ्या भगव्या ध्वजावर सूर्यदेव, ओम आणि काेविदार वृक्षाची चिन्हे काेरलेली असतील.