प्रजातांत्रिक लाेकशाहीत प्रसारमाध्यमांचा चाैथा स्तंभ म्हणून असलेला लाैकिक टिकवण्यासाठी नैतिकता व निर्भयता अत्यावश्यक असून या मूल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वायत्त अर्ध-न्यायिक संस्थेच्या नात्याने प्रेस काैन्सिल प्रभावीपणे पार पाडत आहे, असे मत निवृत्त माहिती अधिकारी रंगराव शिंपुकडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त असाेसिएशन ऑफ स्माॅल अँड मीडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया (अस्मनी) सांगली जिल्हा व शहर इकाईतर्फे आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. शिंपुकडे म्हणाले, ‘प्रसारमाध्यमांवर काेणताही राजकीय वा बाह्य दबाव येऊ नये, हीच लाेकशाहीची मूळ भावना आहे.’ पेड न्यूजच्या प्रकरणातही प्रेस काैन्सिलने स्पष्ट व परखड भूमिका घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. जिल्हाध्यक्ष ए.आय. मुजावर यांनी स्वागत केले. अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मारुती नवलाई यांनी केले. जिल्हा उपाध्यक्ष अनिल आपटे यांनी आभार मानले. अस्मनीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेत