ओशाे - गीता-दर्शन

    23-Nov-2025
Total Views |
 
 

Osho 
 
कुणाला विचारू? काेण देईल उत्तर? मी स्वत:च उत्तर आहे.. मी चूप बसावं, गप्प व्हावं, माैन व्हावं खाेलवर उतरावं.. अस्तित्व काय आहे? हे जाणून घ्यावं. उत्तराचा शाेध न घेता, प्रश्न न विचारता अनुभवाचा मागाेवा घ्यावा. त्या अनुभवात जे फलित हाेतं, त्या अनुभवात व्य्नती परमात्म्याला उपलब्ध हाेते, असं जाणत्यांनी म्हटलं आहे.कृष्ण म्हणताे, ‘असं जाणणाऱ्यांनी म्हटलं आहे.’ असं म्हटलं जातं, ताे असं का म्हणताे? आता आपण ही एक शेवटची गाेष्ट समजून घेऊ आणि मग संध्याकाळी बाेलू.‘असं म्हटलं जातं’ असं कृष्ण का म्हणताे आहे? कृष्ण हे जे असं म्हणताे ते यासाठी की तसा त्याचा दावा नाही, तसं त्याचं म्हणणं नाही. ज्या ज्या कुणी जाणलं त्या त्या सर्वांनी असंच म्हटलं आहे की मी काेणी दावेदार नाही. ‘मीच असं म्हणताे’ असं कृष्णाचं म्हणणं नाही. जे जाणतात त्यांनीही असंच म्हटलं आहे. ज्ञान असं म्हणतं यात व्य्नतीला बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे. अन् लक्षात ठेवा ज्ञानियांत व्य्नती शिल्लक राहात नसते. ‘मी’ असं म्हटलं, बाेलणं झालं तरीही ती उरत नाही.