म्हाडा प्रकल्पांच्या पुनर्विकासाचे धाेरण

    23-Nov-2025
Total Views |
 
 

mhada 
 
मुंबई आणि उपनगरांतील वीस एकर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळावरील म्हाडाच्या प्रकल्पांच्या एकत्रित- समूह पुनर्विकासाच्या सर्वंकष धाेरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रात नागरिकांसाठी माेठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध हाेणार आहेत.म्हाडाच्या मुंबई मंडळाने मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) व अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी 1950 ते 1960 च्या दरम्यान 56 वसाहतींची निर्मिती केली. या वसाहतींत सुमारे 5 हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यातील इमारतींचे बांधकाम जुने झाल्याने इमारती जीर्ण व माेडकळीस आल्याचे निदर्शनास आल्याने म्हाडाने या इमारतींच्या एकत्रितसमूह पुनर्विकासाचे धाेरण तयार केले आहे.
 
या धाेरणानुसार 20 एकर आणि त्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळावरील प्रकल्पांचा म्हाडा एकत्रित-समूह पुनर्विकास करणार आहे. या पुनर्विकासामुळे मूलभूत साेयीसुविधा या अत्याधुनिक स्वरूपाच्याउपलब्ध हाेणार आहेत. यामुळे रहिवाशांना पूर्वीपेक्षा माेठी घरे उपलब्ध हाेणार आहेत.या धाेरणानुसार उच्चतम पुनवर्सन चटईक्षेत्र उपलब्ध हाेणार असल्याने रहिवाशांची संमती घेणे आवश्यक राहणार नाही.तथापि, निविदा प्रक्रियेतून नियुक्त करण्यात येणाऱ्या विकासकास गृहनिर्माण संस्थांचा सहमतीदर्शक ठराव घेणे बंधनकारक राहणार आहे. या पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाच्या अखत्यारितील 114 प्रकल्पांसाठी म्हाडा नियाेजन प्राधिकरण राहणार आहे. गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.