सिडकाेच्या नवी मुंबई मेट्राे प्रकल्पाच्या बेलापूर ते पेणधर या पहिल्या मार्गावरील मेट्राे सेवेला दाेन वर्षे पूर्ण हाेत असतानाच 1 काेटी 15 लाख 28 हजार 297 प्रवाशांचा टप्पा पार करण्याचा माेठा विक्रम नाेंदवला गेला आहे. सिडकाेचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशासाठी मेट्राे टीमचे अभिनंदन केले.बेलापूर-पेणधर मार्गिका सिडकाेने विकसित केली आहे. या मार्गामुळे सीबीडी बेलापूर, खारघर आणि तळाेजाला उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक उपलब्ध झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर आणि मेट्राे सेवेत कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिडकाेने वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सध्या मेट्राे दर 10 मिनिटांनी गर्दीच्या वेळेत आणि 15 मिनिटांनी सामान्य वेळेत उपलब्ध आहे.
तसेच, प्रवासी सुलभतेसाठी तिकीटदर कमी करून किमान 10 रुपये,तर कमाल 30 रुपये इतका ठेवण्यात आला आहे.या साेयींमुळे प्रवासीसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, अवघ्या दाेन वर्षांत प्रवासी संख्या 1 काेटींच्या पुढे गेली आहे. जास्त प्रवासी सेवा घेऊन गेले आहेत. पुढील टप्प्यात नवी मुंबई मेट्राे लाईन 1 बेलापूरहून थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाढवली जाणार आहे.तसेच लाईन 2 पेंडहर-तळाेजा औद्याेगिक वसाहतमार्गे कळंबाेली आणि कामाेठेद्वारे पुन्हा एनएमआयएपर्यंत नेण्याची याेजना असून तिची एकूण लांबी अंदाजे 16 कि.मी. असेल, असे सिडकाेकडून सांगण्यात आले