भारताला 2047 पर्यंत ‘विकसित देश’ बनवण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आणि सर्वच देशवासीयांचे स्वप्न आहे. ही स्वप्नपूर्ती विज्ञान व तंत्रज्ञानाच्या लाेकसंवादाशिवाय साध्य हाेणार नाही.बाल संशाेधक अरजित माेरेने ‘जिज्ञासा’ पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जाेड दिली आहे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे मत वैज्ञानिक आणि औद्याेगिक संशाेधन परिषदेच्या (सीएसआयआर) राष्ट्रीय रासायनिक प्रयाेगशाळेचे (एनसीएल) संचालक डाॅ. आशिष लेले यांनी व्यक्त केले.एनसीएलच्या सभागृहात विद्यार्थी अरजित माेरे याच्या ‘जिज्ञासा : फ्राॅम क्युरिऑसिटी टू क्लॅरिटी’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. लेले व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. यावेळीएनसीएलचे शास्त्रज्ञ डाॅ. वाफिया मसीह, डाॅ. नरेंद्र कडू, डाॅ. एम. कार्तिकेयन, डाॅ. महेश धरणे, डाॅ. राकेश जाेशी, डाॅ.राजेश गाेन्नाडे, डाॅ. शुभांगी उंबरकर, तसेच महावितरणचे अमाेल माेरे, डाॅ.संताेष पाटणी, निशिकांत राऊत आदीमान्यवर उपस्थित हाेते.
या पुस्तकाच्या लेखनासाठी अरजित माेरेचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. के. पी. गाेरे, स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका णती मित्रा यांनी काैतुक केले आहे.अरजितचे हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचले पाहिजे. विद्यार्थिदशेतील वैज्ञानिक कुतूहल व त्याचे नेमके वास्तव याची मांडणी अरजितने केली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना संशाेधनासाठी प्रेरणा मिळेल, असे पवार यांनी सांगितले.यावेळी उपस्थितांनी मनाेगतातून अरजितच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि निरीक्षण क्षमतेचे काैतुक केले. अरजित माेरे हा जिल्हा इन्स्पायरमानक अॅवाॅर्ड 2025 व हाेमी भाभा बालवैज्ञानिक सुवर्णपदक 2024 चा मानकरी आहे.त्याचे तीन संशाेधन लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून, त्याने इल्यूम्ब्रेला, स्पाईनाेगिअर व गटरगार्ड यासारख्या सामाजिक उपयुक्तता असलेले संशाेधन विकसित केले आहे. ‘जिज्ञासा’ उपक्रमाचा फायदा व शास्त्रज्ञांनी केलेले मार्गदर्शन कसे महत्त्वाचे ठरले, याबाबत त्याने मनाेगत व्यक्त केले.