ऑनलाइन माध्यमातून इमारत बांधकाम आराखडे मंजूर करून घेण्यापूर्वी नागरिक, विकासकांना कल्याण डाेंबिवली महापालिकेतील विविध विभागांचे नाहरकत दाखले मिळवावे लागतात. हे दाखले मिळवण्यात वेळ जात असल्याने ऑनलाईन इमारत आराखडे मंजूर करण्यात नगररचना विभागाला अडचणी येत हाेत्या.या अडचणी दूर करण्यासाठी पालिका आयु्नत अभिनव गाेयल यांच्या संकल्पनेतून विविध विभागांचे ना-हरकत दाखले एका खिडकीवर उपलब्ध हाेतील, अशी केडीस्वीफ्ट प्रणाली पालिकेत सुरू करण्यात आली आहे.अशा प्रकारची प्रणाली राबवणारी कल्याण डाेंबिवली ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. इमारत आराखडे ऑनलाइन माध्यमातून (बीपीएमएस) मंजूकरण्याबराेबरच, एक खिडकी याेजनेतून विकासक, नागरिकांना इतर विभागांचे नाहरकत दाखले मिळवून देणारी पालिकेची ही तांत्रिक भरारी आहे.
पालिका नगररचना विभागाच्या माध्यमातून पालिकेला सुमारे 600 काेटींहून अधिकचा महसूल दरवर्षी मिळताे. या विभागात दाखल हाेणारे इमारत आराखडे, इतर प्रस्ताव विना अडथळे मंजूर हाेणे आवश्यक आहे, असे आयु्नतांचे मत आहे.बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टिमच्या (बीपीएमएस) माध्यमातून पालिका हद्दीतील विकासक, वास्तुविशारद पालिका नगररचना विभागात ऑनलाइन माध्यमातून इमारत बांधकामाचे आराखडे आपल्या कार्यालय, घरातून ऑनलाइन माध्यमातून दाखलकरतात. हे आराखडे दाखल करण्यापूर्वी दाखलकर्त्यांना पालिकेतील पाणीपुरवठा, अग्निशमन, मल, जलनिस्सारण, उद्यान, कर विभाग अशा अनेक विभागांचे ङ्गना हरकत दाखलेफ इमारत बांधकाम प्रस्तावाबराेबर दाखल करावे लागतात.
हे दाखले मिळण्यात दाखलकर्त्यांना त्या विभागांमध्ये प्रत्यक्ष फेऱ्या माराव्या लागत हाेत्या. आयु्नत गाेयल यांनी विविध विभागांचे ना- हरकत दाखले एका खिडकीवर कसे उपलब्ध हाेतील या दृष्टीने नवीन तांत्रिक प्रणाली विकसित करण्याच्या सूचना केल्या. आयु्नतांच्या संकल्पनेतून बीपीएमएस, एमसीएचआय, पालिका नगररचना विभागाचे सहायक संचालक नगररचना संताेष डाेईफाेडे, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे, उपायु्नत समीर भूमकर यांनी केलेले एकत्रित प्रयत्न आणि पुढाकारातून केडी-स्वीफ्ट प्रणाली विकसित झाली.या प्रणालीमुळे विकासक, नागरिकांना पालिकेत न येता काेणत्याही विभागात न जाता ऑनलाइन पद्धतीने एका अर्जावर विविध विभागांचे ना हरकत दाखले उपलब्ध हाेणार आहेत.