राज्याच्या शिक्षणव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ याेजना तयार करणे पुरेसे नसून, त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी सातत्याने झाली पाहिजे.विद्यापीठांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन पातळी सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक विद्यापीठाशी थेट जाेडलेले टास्क फाेर्स स्थापन करून ते दर पंधरवड्याला प्रगती अहवाल सादर करतील अशी प्रणाली निर्माण करावी, असे निर्देश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिले.राष्ट्रीय शिक्षण धाेरण 2020 आणि व्हिजन महाराष्ट्र 2047 या विषयावर राजभवनात झालेल्या कार्यशाळेत राज्यपाल बाेलत हाेते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगाेपाल रेड्डी तसेच राज्यातीलसर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित हाेते.शैक्षणिक धाेरणासंदर्भातील कार्यशाळेचे आयाेजन दर तीन महिन्यांनी उच्च तंत्रशिक्षण विभागामार्फत करण्यात येते. या पुढेही कार्यशाळेत ऑनलाइन माध्यमातून सहभागी हाेऊन मार्गदर्शन करण्याची विनंती पाटील यांनी राज्यपालांना केली.वेणुगाेपाल रेड्डी यांनी महाराष्ट्राला एज्युकेशन हब बनवण्यासाठी विकसित महाराष्ट्र 2047 राज्य सार्वजनिक विद्यापीठांची भूमिका निश्चित करणे या विषयावर आधारित पीपीटीचे सविस्तर सादरीकरण केले.