राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगानळगंगा नदीजाेड प्रकल्पाच्या सर्वे क्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच, अन्वेषण, संकल्पना व अंदाजपत्रक तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत.नागपूर जिल्ह्यातील गाेसेखुर्द जलाशयातून 62.57 टीएमसी पाणी पावसाळ्यातील कालावधीत उचलून सुमारे 388 कि.मी.लांबीच्या जाेड कालव्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पापर्यंत नेण्याचे नियाेजन या प्रकल्पात आहे.पावसाळ्यात नद्यांमधून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी छाेट्या व मध्यम प्रकल्पांत साठवून ते शेतीसाठी उपलब्ध करण्याचा उपक्रम आहे. या प्रकल्पात 32 नवीन धरणांची उभारणी आणि अस्तित्वातील 17 धरणांपैकी 10 धरणांची उंची वाढवण्याचे प्रस्तावित आहे. नागपूरस्थित सिएन्सीस टेक लिमिटेड या संस्थेला प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण आणि अन्वेषणाचे काम देण्यात आले.
कंपनीने गेल्या महिन्यात हेलिकाॅप्टरद्वारे हवाई सर्वेक्षण, तसेच लिडार तंत्रज्ञानाचा वापर करून क्षेत्राचीमाेजणी पूर्ण केली.अकाेला, वाशिम आणि बुलढाण्यासह आठ जिल्ह्यांत प्रस्तावित धरणांची ठिकाणे, धरणरेषा, बुडीत क्षेत्र, तसेच संभाव्य लाभक्षेत्राचे निर्धारण या सर्वेक्षणातून झाले. प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाची छाननी प्रक्रियाही प्रगतिपथावर आहे.प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आठ जिल्ह्यांतील हजाराे हेक्टर शेतीचे सिंचनक्षेत्र लक्षणीय वाढणार आहे. त्यात अकाेला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, भंडारा, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत नवीन धरणे व काही धरणांची उंची वाढवली जाणार आहे. त्यामुळे पाणीसाठा क्षमता वाढेल आणि भूजल पुनर्भरणालाही हातभार लागेल.