तुम्हाला शाहरुखच्या फॅन फाॅलाेइंगचं उदाहरण द्यायचं झालं तर, शाहरुखच्या नावानं तब्बल 4000 काेटींची बिल्डिंग उभारली जातेय. तब्बल 56 माळ्यांच्या या टाॅवरमध्ये कित्येक अॅमिनिटीज असणार आहेत. ही बिल्डिंग कुठे उभारली जातेय, हे माहितीय का? नुकताच मुंबईत एक इव्हेंट पार पडला.या इव्हेंटमध्ये शाहरुख खान उपस्थित हाेता.याच इव्हेंटमध्ये शाहरुख खाननं त्याच्या नावानं दुबईत बांधल्या जाणाऱ्या ‘शाहरुख्ज डेन्यूब’ नावाच्या इमारतीचं उद्घाटन केलंय. इमारतीचे शिल्पकार रिझवान साजन देखील उपस्थित हाेते. रिझवान साजन यांनी दुबईमध्ये शाहरुख खानच्या नावानं इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. शाहरुख खान त्याच्या नावानं बांधल्या जाणाऱ्या इमारतीबद्दल खूप आनंदी आहे.शाहरुख म्हणाला की, जर माझी आई आज असती तर तिला खूप आनंद झाला असता. हा एक माेठा सन्मान आहे... जेव्हा माझी मुलं येतील, तेव्हा मी त्यांना सांगेन, ते पाहा, त्यावर तुमच्या वडिलांचं नाव लिहिलंय.
ही बाबांची बिल्डिंग आहे.मी कधीही काेणत्याही गाेष्टीचं नाव, स्वतः च्या नावावर ठेवत नाही. माझी कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आहे आणि माझं घर मन्नत आहे... मी स्वतःला इतकं महत्त्व देत नाही की, मी वस्तू घेईन आणि त्यावर माझं नाव लावेन... फक्त एखादा चित्रपट वगळता, कारण ते माझं काम आहे आणि ते माझ्यासाठी ईश्वरासमान आहे...शाहरुखच्या नावानं बांधण्यात येणारी ही इमारत, शाहरुख्ज डेन्यूब, हा एक व्यावसायिक टाॅवर आहे, या मालमत्तेची किंमत सुमारे 4,000 काेटी असण्याचा अंदाज आहे. या टाॅवरमध्ये 56 मजले असतील. मुस्लिम देशात पहिल्यांदाच मुस्लिम अभिनेत्याचा पुतळा बसवणं हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. टाॅवरमध्ये हेलिपॅड आणि स्विमिंग पूल देखील असेल.शाहरुख खानच्या नावानं बांधण्यात येणारी ही इमारत 2029 पर्यंत पूर्ण हाेईल.