दिल्लीतील भागाला कॅनाॅट प्लेस नाव कसे पडले?

    23-Nov-2025
Total Views |
 
 
 

DL 
कॅनाॅट प्लेस हा केवळ दिल्लीतील एक बाजार नाही तर दिल्लीचे हृदय मानले जाते. जिथे प्रत्येक ब्रँड हजेरी लावत असताे. स्ट्रीट फूडचा वास येताे आणि जिथे प्रत्येकाला आपल्या घड्याळाचे काटे थाेडे हळू करायचे असतात. निवांतपणे खरेदी करत फिरायचे असते. परंतु या ऐतिहासिक जागेचे नाव कॅनाॅट प्लेस का पडले आणि आधी त्याठिकाणी काय हाेते असा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? कॅनाॅट प्लेसचे नाव कसे पडले? कॅनाॅट प्लेस हे नाव ऐकल्यावर एक शाही अनुभूती येते. खरे तर हे नाव थेट एखाद्या व्यक्तीच्या नावावर ठेवले गेले नाही, तर त्याच्या मागे ब्रिटिश राजवटीचा शाही दुवा आहे. कॅनाॅट हे नाव आयर्लंडच्या चार प्रांतांपैकी सर्वात लहान प्रांताचे नाव आहे.कॅनाॅट प्लेसचे नाव एखाद्या भारतीयाच्या नावावर नाही, तर ब्रिटनच्या राजघराण्यातील एका सदस्याच्या नावावरून ठेवण्यात आले हाेते.
 
सदस्याचे नाव ड्यूक ऑफ कॅनाॅट अँड स्ट्रॅथर्न हाेते, ज्याचे पूर्ण नाव प्रिन्स आर्थर हाेते.1921 मध्ये प्रिन्स आर्थर भारतात आला.ताे राणी व्ह्निटाेरियाचा तिसरा मुलगा आणि किंग जाॅर्ज सहावा याचा काका हाेता. त्यांच्या भारतात आगमनाचा सन्मान म्हणून ब्रिटिश सरकारने दिल्लीत बांधल्या जाणाऱ्या या भव्य बाजाराला त्यांच्या ड्यूक ऑफ कॅनाॅट या उपाधीवरून कॅनाॅट प्लेस असे नाव दिले. हा बाजार त्या काळातील एक हाय स्ट्रीट मार्केट हाेता. कॅनाॅट प्लेसचा इतिहास 1929 मध्ये सुरू झाला. ब्रिटिशांनी लुटियन्सच्या दिल्लीचा एक भाग म्हणून याच्या बांधकामाला सुरुवात केली आणि ते 1933 मध्ये पूर्ण झाले. त्याची रचना ब्रिटिश आर्किटे्नट राॅबर्ट टाॅर रसेल यांनी केली हाेती.त्यांनी लंडनच्या जाॅर्जियन वास्तुकलेपासून प्रेरणा घेऊन कॅनाॅट प्लेसची रचना केली.
 
ही जागा पूर्वी कशी हाेती? आश्चर्याची गाेष्ट म्हणजे आज ज्या ठिकाणी कनाॅट प्लेस आहे तिथे सुमारे 100 वर्षांपूर्वी माधाेगंज, जयसिंहपुरा आणि राजा का बाजार नावाची गावे हाेती. हे एक वनक्षेत्र हाेते, परंतआता ते भारतातील प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एक आहे हा परिसर घनदाट किकरच्या झाडांनी भरलेले जंगल हाेते. परिसरात जंगली डुक्करे आणि हरणे, श्वापदे फिरत असत. नवी दिल्लीचे बांधकाम सुरू झाल्यावर या गावांतील रहिवाशांना बेदखल करून ब्रिटीश शैलीत या भागाचा विकास करण्यात आला.
कॅनाॅट प्लेस या बाजारपेठेची रचना घाेड्याच्या नालेच्या आकाराची आहे, जी खरेदीदार आणि दुकानदार दाेघांसाठी भाग्यवान ठरेल अशी ब्रिटिशांची शद्धा हाेती. आता हे दिल्लीचे एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे, ज्यात आधुनिकता आणि वसाहतकालीन आकर्षक बांधकामाचे रूप आहे. कॅनाॅट प्लेस भारत सरकारच्या मालकीचे आहे, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळातील भाडेपट्ट्यांमुळे अजूनही बरेच भाडेकरू अगदी किरकाेळ भाडे देतात. अद्यापही त्यात काेणताही बदल झालेला नाही.