राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घाेषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-1 मधून वगळून शेड्यूल-2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करून सादर करावा.मानवांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांवर नियंत्रणासाठी आवश्यक ठिकाणी तातडीने पिंजरे बसवावेत. यासाेबतच पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दाेन रेस्क्यू सेंटर पुढील दाेन ते तीन महिन्यांत सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्दे श दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार शरद साेनवणे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मदत व पुनर्वसनविभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंघल, राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास रेड्डी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित हाेते.बिबट्यांची समस्या वाढल्यामुळे नागरिकांत राेष आहे. यावर तातडीने उपाययाेजना करण्यासाठी गाव व शहराजवळ फिरणाऱ्या बिबट्यांना ड्राेनच्या साह्याने शाेधून त्यांना पकडावे.त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने वाढवावे. नागरी वस्तीत बिबटे आल्यास ताे नरभक्षक समजूनच त्याला पकडावे.
बिबट्यांचा वावर असलेल्या भागात रेस्क्यू टीम व वाहनांची संख्या वाढवावी, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी तातडीने उपाययाेजना करावी.बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी पाेलीस व वन विभागाने गस्त वाढवावी; तसेच बिबट्यांचा वावर असलेल्या पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील भागांत शाळांची वेळ सकाळी 9.30 ते 4 अशी करावी. रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने निधीचा प्रस्ताव द्यावा, असे पवार यांनी सांगितले.बिबट्यांना जंगलामध्येच भक्ष्य मिळण्यासाठी जंगलात शेळ्या साेडाव्यात.बिबट्यांना पकडण्यासाठी पुणे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 1200 पिंजरे पुरवणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.वळसे-पाटील, दाैंडचे आमदार राहुल कुल, काेपरगावचे आमदार आशुताेष काळे, श्रीरामनगरचे आमदार लहू कानडे यांनीही उपाययाेजनेची मागणी केली.