कर्क

    23-Nov-2025
Total Views |

Horoscope 
 
या आठवड्यात तुमच्यासाठी मानसिक स्थैर्य व संतुलित दृष्टिकोन महत्त्वाचा असेल. तुमचे जुने प्रोजेक्ट व लांबलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. तुमची आर्थिक स्थिती बळकट असेल. तुम्हाला तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून भरीव सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
 
■ नोकरी-व्यवसाय हा आठवडा तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येणारा व तुम्हाला व्यस्त राखणारा असेल. तुम्ही तुमच्या योजनांवर लक्ष केंद्रित करावे आणि सहकाऱ्यांसोबत ताळमेळ राखावा. या आठवड्यात व्यापारी मंडळींना त्यांच्या व्यवसायात फायद्याची शक्यता आहे पण गुंतवणूक करताना दक्षता बाळगावी.
 
■ नातीगोती : या आठवड्यात तुमच्या कौटुंबिक जीवन तसेच प्रेमसंबधांत गोडवा राहणार आहे. तुमचा तुमच्या जोडीदारासोबत परस्पर सहयोग आणि प्रेम वाढत राहील. संवादात सावधगिरी बाळगावी. एखादा जुना मित्र भेटेल व त्याच्यासोबत तुम्ही जुन्या आठवणी उजळून आनंदात वेळ घालवाल.
 
■ आरोग्य या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहणार आहे. पण ते चांगले राहावे यासाठी तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर ताबा ठेवायला हवा. विशेषतः पोटाच्या समस्या उद्भवण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. नियमित व्यायाम व समतोल आहाराला प्राधान्य द्यावे
 
■ शुभदिनांक : २३, २६, २८ शुभरंग लाल, सोनेरी, पांढरा
 
■ शुभवार रविवार, सोमवार, बुधवार
 
■ दक्षता : विनाकारण वाद घालू नये आणि आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगा.
 
■ उपाय : या आठवड्यात सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. तसेच ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करावा.