स्वामिनाथन, टाटा फाऊंडेशनशी कृषी विभागाचे करार

    09-Oct-2025
Total Views |
 

tata 
 
कृषी विभाग, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन, ग्रामविकास विभाग आणि टाटा माेटर्स फाऊंडेशन यांच्यासाेबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांमुळे राज्यात शेती, महिला सक्षमीकरण, पाेषण सुरक्षा आणि ग्रामीण विकास क्षेत्रांत विकासाचे नवे पर्व सुरू हाेईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे करार झाले. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गाेरे, राज्यमंत्री याेगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषी विभागाचे अतिर्नित मुख्य सचिव डाॅ.विकासचंद्र रस्ताेगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, एम. एस.स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या डाॅ.साैम्या स्वामिनाथन, टाटा माेटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनाेद कुलकर्णीआदी उपस्थित हाेते.
 
ग्रामविकास विभागासाेबत टाटा माेटर्स यांच्यासमवेत झालेला करार ग्रामीण विकासाला गती देणारा आहे. या कराराच्या माध्यमातून 63 ग्रामपंचायतींत प्रभावी काम हाेईल आणि त्यातून पुढील काळात स्केलअप करता येईल.ग्रामविकास विभागाच्या समृद्ध ग्राम मिशनला या करारामुळे चालना मिळेल.गावांच्या शाश्वत विकासासाठी आणि गरिबीनिर्मूलनासाठी या उपक्रमांमधून सक्षम पायाभूत रचना उभारली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यात संरक्षण, लागवड, खरेदी आणि विपणन या घटकांवर अधिक भर देण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.