डाॅ. आंबेडकर स्मारकाच्या कामाचा सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांच्याकडून आढावा

    09-Oct-2025
Total Views |
 
 
 

shir 
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमध्ये उभारण्यात येत असलेल्या स्मारकाचा व पुतळ्याच्या कामाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. यावेळी आनंदराज आंबेडकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डाॅ.हर्षदीप कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित हाेते. समुद्राच्या शेजारी हे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. डाॅ.आंबेडकरांच्या पुतळा उभारणीबाबत शिल्पकार राम सुतार यांनी केलेल्या सूचनांचा विचार करण्यात आला असून, त्याबाबत संबंधित विभागास माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर 2026 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.